जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंती साजरी
प्रकाशन दिनांक : 09/12/2020
औरंगाबाद दि. 08 (जिमाका) – संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, मंदार वैद्य जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंजारे, नायब तहसीलदार उद्धव नाईक आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. त्यांनीही संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.