बंद

जिल्हाधिकारी कार्यालयात 2 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन

प्रकाशन दिनांक : 29/07/2021

औरंगाबाद, दिनांक 29 (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येतो. ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविले आहे.

अर्जदारांनी तक्रारी संबंधांत निवेदने, अडीअडचणीबाबतचे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन प्रतीत विहित नमुन्यात सादर करावा. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्जदारांनी तालुकास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करुन त्याची पोचपावती जिल्हास्तरीय लोकशाही दिनात सादर करण्यात येणाऱ्या अर्जासोबत जोडावी. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्वी, अपिल्स, सेवाविषयक, लोकशाही दिनी यापूर्वी  दाखले केलेले अर्ज,आस्थापनाविषयक बाबींचा यात समावेश नसावा. तक्रारदारांनी, निवेदनकर्त्यांनी स्वत: तक्रार, निवेदन दाखल करावे व लोकशाही दिनात उपस्थित रहावे, तसेच सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगाने शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुनच अर्जदारांना छोट्या संख्येच्या गटात समक्ष बोलावून लोकशाही दिनाचे आयोजन करुण्यात येईल, असेही कळविले आहे.