जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक जयंती साजरी
प्रकाशन दिनांक : 02/07/2021
औरंगाबाद, दि. 1 (जिमाका) – जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, मंदार वैद्य, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, सहायक पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर यांची उपस्थिती होती.
