जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
प्रकाशन दिनांक : 15/08/2020
औरंगाबाद, दि.15 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
