बंद

जिल्हादंडाधिकाऱ्यांव्दारे पैठणच्या एकनाथ षष्ठीनिमित्त आयोजित यात्रेस स्थगिती

प्रकाशन दिनांक : 16/03/2021

औरंगाबाद, दिनांक 15 (जिमाका): जिल्हयात कोरोना या रोगांचा प्रादूर्भाव वाढू नये तसेच जिवित हानी होऊ नये या दृष्टीने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद यांनी  श्री. क्षेत्र पैठण, ता.पैठण, जि.औरंगाबाद येथील एकनाथ-षष्टी निमित्त आयोजित यात्रेस स्थगिती दिली आहे. या संबंधीचे स्थगिती आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आले आहे.