बंद

जिल्हादंडाधिकारी यांचे व्दारा कलम 144 लागू

प्रकाशन दिनांक : 17/12/2020

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका): फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) व (3) अन्वये, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांनी औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणे करीता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) व (3) लागू करित आहे. हे आदेश 31 डिसेंबर 2020 पर्यंत अंमलात राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांच्याव्दारा आदेशात नमूद आहे.