बंद

जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

प्रकाशन दिनांक : 12/01/2021

औरंगाबाद, दिनांक, 12 (जिमाका): राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांना आज जयंती दिनानिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, नायब तहसिलदार ए. जी. पटवारी यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.