बंद

जनावरांमध्ये मान्सून पूर्व लसीकरण करुन घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 03/06/2021

औरंगाबाद, दि.03, (जिमाका) :- पावसाळ्यात जनावरांमध्ये घटसर्प(HS), फऱ्या(BQ) या आजारांनी रोगराई होण्याची शक्यता असल्यामुळे अशा रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये व पशुधनाचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थामध्ये मोठ्या जनावरांसाठी मान्सून पूर्व लसीकरण तसेच शेळ्यामेंढयासाठी आंत्रविषार (ETV) लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच कुठलेही पशुधन आजारी असल्याचे निदर्शनास आल्यास नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी केले आहे.

सध्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घटसर्प (HS) सदृष्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. नजिकच्या सीमेवरील तालुक्यातील व जिल्ह्यामधील पशुपालकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संसर्गजन्य आजारापासून संरक्षण होण्यासाठी पशुपालकांनी जनावरांना लसीचे नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लसीकरण करुन घ्यावे. पशुंच्या कानात लसीकरण करण्यापूर्वी 12 अंकी बारकोड असलेला बिल्ला नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडून मोफत मारुन घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले