बंद

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेतील कोविड केअर केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

प्रकाशन दिनांक : 22/09/2020

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेतील कोविड केअर केंद्रास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मनपा प्रशासक अस्तिककुमार पांण्डेय यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

भविष्यातील कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन संस्थेत असलेल्या साधनसुविधांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. या केंद्रात आवश्यक असलेल्या ऑक्सिजन खाटांबाबत, संभाव्य साधन सुविधांबाबबची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांच्या समवेत श्री. पांण्डेय, शहर अभियंता सखाराम पानझडे, संस्थेचे अध्यक्ष  रणजीत मुळे, प्रशासकीय अधिकारी श्रीकांत देशमुख, कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, दंत महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुभाष भोयर आदींची देखील उपस्थिती होती.

coll