बंद

घाटीतील डॉक्टरांच्या अलगीकरणाबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश निर्गमित

प्रकाशन दिनांक : 03/09/2020

औरंगाबाद, दि.02 (जिमाका) :- कोविड – 19 विषाणू प्रादुर्भावात जिल्ह्यातील गंभीर स्थितीतील कोरोना बाधितांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) येथे उपचार केले जात आहेत. हा संसर्गजन्य आजार असून त्या पार्श्वभूमिवर सुनील चव्हाण जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण औरंगाबाद यांनी खबरदारीचा उपाय म्हणून घाटीतील सर्व डॉक्टरांच्या अलगिकरण व्यवस्थेसाठी आदेश निर्गमित केले आहे. त्या आदेशानूसार घाटीतील सर्व डॉक्टरांच्या निवास व भोजनाची व्यवस्था हॉटेल विट्स, रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे.

या अलगिकरण व्यवस्थेमुळे घाटीतील डॉक्टरांपासून त्यांच्या कुटुंबियांना होणाऱ्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता या धोक्यापासून बचाव करण्यात सहाय्य होणार आहे.