घाटीचा बाह्यरुग्ण विभाग 30 ला बंद व 29 नोव्हेंबरला सुरु
प्रकाशन दिनांक : 30/11/2020
औरंगाबाद,दि.27 (जिमाका) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा बाहयरूग्ण विभाग रविवार दि. 29 नोव्हेंबर रोजी चालू राहील. तर गुरूनानक जयंतीनिमित्त 30 नोव्हेंबरला शासकीय सुट्टी असल्यामुळे बाहयरूग्ण विभाग बंद राहिल, असे वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद यांनी कळवले आहे.