ग्रामीण भागात दोन दिवस रात्रीची संचारबंदी
प्रकाशन दिनांक : 30/12/2020
औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका) : फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार 31 डिसेंबर 2020 व 01 जानेवारी 2021 या दोन दिवसांसाठी रात्री 11 ते सकाळी 06वाजेपर्यंत औरंगाबाद ग्रामीण भागात रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्यात असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.