बंद

ग्रामीण भागात कोविड चाचणी मोहीम सक्रियपणे राबवावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 16/06/2021

  • चाचणी न करता दुकाने सुरू ठेवल्यास दंडात्मक करावाई
  • ग्रामीण लोकसहभाग वाढवावा
  • शंभर टक्के चाचण्या केलेल्यांना गौरान्वीत करावे

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बाधीत दर कमी होण्याच्या दृष्टीने कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. त्यादुष्टीने व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थांच्या सहभागातून यंत्रणांनी चाचणी मोहीम सक्रीयपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ग्रामीण भागात कोविड चाचण्यांमध्ये वाढ करण्याच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधिताना निर्देश दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरेग्य आधिकारी  डॉ. शेळके, डॉ. लड्डा, यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,  सर्व संबंधित, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, वैद्यकीय अधिकारी, ऑनलाईन उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी ग्रामीण भागातील संसर्गाचे प्रमाण कमी करून शहराप्रमाणे जिल्ह्याचा ग्रामीण भागही स्तर एक मध्ये  आणण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी कोविड चाचण्या वाढवण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे सूचित करून गावामध्ये सर्व व्यापारी, दुकानदार, विक्रेते, धार्मिक विधी करणारे यासह सर्व नागरिकांच्या चाचण्या करण्याचे प्रमाण वाढवावे. जेणेकरून ग्रामीणचा बाधित दर कमी होण्यास मदत होईल ब्रेक द चेनच्या या टप्प्यात शाळा, महाविद्यालय, धार्मिक, पर्यटन स्थळाव्यतीरिक्त सर्व बाबी खुल्या करण्यात आल्या आहेत. बाजारपेठ सुरू करण्यास आता परवानगी देण्यात आली असून गर्दीचे प्रमाण यामुळे वाढणार आहे. त्यातून निर्माण होणारा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी सर्व दुकाने, व्यापारी, व्हॉटेल, सर्व व्यावसायिक आस्थापनांनी त्यांच्या मालक, कर्मचारी या सर्वांचे कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. विनाचाचणी कोणत्याही दुकानदाराला व्यापाऱ्याला व्यवसाय, विक्री करता येणार नाही, यासाठी सर्व संबंधितांनी येत्या रविवारच्या आत चाचण्या करणे बंधनकारक आहे. विना चाचण्या दुकान उघडणाऱ्यांवर स्थानिक यंत्रणांनी तातडीने कारवाई करून दुकान सील करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

तसेच जनतेने, व्यापारी वर्गाने मोठ्या संख्येने चाचणीसाठी पूढे यावे, यादृष्टीने उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह सर्व संबंधितांना जनजागृती करून प्रत्यक्ष व्यापारी, दुकानदार यांच्यासोबत संवाद साधून बाजारपेठांमधून पाहणी पथकांव्दारे चाचणी सुविधेची माहिती संबंधितांना द्यावी. तसेच विहित मुदतीनंतरही चाचणी न करता दुकान सुरू ठेवणाऱ्यांची दुकाने सील करण्यात येतील. त्याबाबत पूर्व कल्पना द्यावी. शंभर टक्के चाचणी करणाऱ्या व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांचा गौरव करावा. चाचण्यांसाठी लोकांनी उत्स्फुर्तपणे पुढे यावे यासाठी संबधितांनी नाविण्यूपूर्ण उपक्रम राबवून ग्रामीण भागामध्ये चाचणी मोहिम ही लोकचळवळीच्या स्वरुपात यशस्वी रित्या राबवावी. जेणेकरुन लवकरच औरंगाबाद शहराप्रमाणे औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याही स्तर तीन मधून लेवल एक मध्ये आणता येईल या उद्देशाने सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वायतून उल्लेखणीय काम करावे.

तसेच कोवीड लस घेतलेल्यांना चाचण्याधून सुट दयावी. मात्र लस घेतलेल्यां पैकी लक्षणे आढळून आलेल्यांची चाचणी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात घाटी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रयोगशाळा आणि जिल्हा रुग्णालयातील स्पाइस मोबाईल प्रयोग शाळा अशा तीन ठिकाणी  जवळपास दहा हजार चाचण्यांची क्षमता तयार करण्यात आली असून अधिकाधिक संख्येने आरेाग्य यंत्रणांनी  स्वॅब घेण्याची व्यवस्था वाढवावी. आरटीपीसीआर चाचण्यांना प्राधान्य दयावे. गरजेनूसार ॲण्टीजेन चाचण्याही कराव्यात. व्यापारी वर्गाचे, दुकानदार, स्टेशनरी, हॉटेल व्यावसायिक, औषधी, किराणा, कापड व्यावसायीक, इतर दुकाने, दुरस्ती, इलेक्टॉनिक अशा वर्गवारी निहाय व्यावसायिक आस्थापनांची संख्यात्मक माहिती, चाचण्या झालेल्यांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना श्री.चव्हाण यांनी संबंधिताना दिल्या.

सर्व उपविभागीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तहसिलदार यांनी चाचण्या वाढवण्याबाबतच्या नियोजनाची यावेळी माहिती दिली.

ग्रामीण भागात कोविड चाचणी मोहीम सक्रियपणे राबवावी