बंद

ग्रामीण भागातील लसीकरण पूर्ण करा – डॉ. अनंत गव्हाणे

प्रकाशन दिनांक : 28/01/2021

औरंगाबाद, दिनांक 27 (जिमाका) :  कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील सर्वांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणामध्ये ग्रामीण भागातील लसीकरण पूर्ण करण्यावर अधिक भर द्यावा, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी यंत्रणांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोना लसीकरण आढावा बैठक श्री. गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके आदींसह तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुगणालायचे वैद्यकीय अधीक्षक यांची उपस्थिती होती.

डॉ. गव्हाणे यांनी ग्रामीण भागातील उर्वरीत सर्व आरोग्य यंत्रणांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरण व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लसीकरणाबाबत योग्य नियोजन करून कालबद्ध पद्धतीने लसीकरणाची कार्यवाही पार पाडावी. त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत काही शंका असल्यास संबंधित आरोग्य यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. गव्हाणे यांनी केले.

ग्रामीण भागातील लसीकरण पूर्ण करा