ग्रामपंचायत पोट निवडणूक 2021 साठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
प्रकाशन दिनांक : 03/12/2021
औरंगाबाद,दि. 2 (जिमाका) : निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेलया ग्रामपंचायतीतील रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणूकीबाबतचा कार्यक्रम मा. राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांचेकडून जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतीतील 185 रिक्त सदस्य पदांचया ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकासाठी तालुका निवडणूक निरीक्षक म्हणून खालील अधिकारी यांची याद्वारे नियुक्ती करण्यात येत आहे. तालुका औरंगाबादाचे तहसीलदार औरंगाबाद, पैठणचे तहसीलदार पैठण, फुलंब्रीचे तहसीलदार फुलंब्री, कन्नडचे तहसीलदार कन्नड, खुलताबादचे तहसीलदार खुलताबाद, वैजापूरचे तहसीलदार वैजापूर, गंगापूरचे तहसीलदार गंगापूर, सिल्लोडचे तहसीलदार सिल्लोड, सोयगावाचे तहसलीलदार सोयगाव नियुक्त सनियंत्रण अधिकारी यांचे अनुषंगाने खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
निवडणूक निरीक्षक म्हणून तहसिलदार संवर्गातील अधिकारी यांनी आवश्यक ते निरीक्षण करुन वेळोवेळी जिल्हाधिकारी यांना निवडणूक निरीक्षणाबाबतचे अहवाल सादर करुन त्याची प्रत मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांना सादर करावी. तहसिलदार संवर्गातील तालुका निहाय नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक यांनी त्यांना नेमुन दिलेल्या तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीचे निवडणूक कामकाज योग्य पदधतीने होत आहे किंवा कसे यावर नियंत्रण ठेवरून संबंधीत तहसिलदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. निवडणूक कामामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही यांची सर्व संबंधीत अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने निर्देशित केले आहे.