बंद

गोगा बाबा टेकडीवरील वृक्ष लागवडीचा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आढावा

प्रकाशन दिनांक : 20/05/2022

औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गोगा बाबा टेकडी व परिसरात लावण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीसंदर्भातील आढावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात यासंबंधी बैठक पार पाडली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, इको बटालियनचे कॅप्टन हित मेहता, सामाजिक वनीकरण विभागाच्या वन अधिकारी श्रीमती के. के. जमदाडे- कोकाटे, क्षेत्रीय वन अधिकारी अनिल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजोय चौधरी, आयसीआयसीआय बँकेचे गौरव शिंगोटे, वेरूळ येथील श्री.संत जनार्दन स्वामी आश्रमाचे रामानंद महाराज, जगन्नाथ काळे, आश्रमाचे प्रशासकीय अधिकारी काकासाहेब गोरे, विश्वस्थ पोपटराव पवार, दिनेश भूतेकर आदींची उपस्थिती होती.