बंद

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‘शक्ती फौजदारी कायदे विधेयक’ बाबत संयुक्त समितीची बैठक संपन्न

प्रकाशन दिनांक : 01/02/2021

औरंगाबाद: दि 29 (जिमाका) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक-51 शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 यावरील संयुक्त समितीची महिला संघटना आणि औरंगाबाद खंडपिठाच्या तसेच जिल्हा सत्र न्यायालयाच्या वकील संघटनांच्या प्रतिनिधी समवेत आज बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित महिला संघटनांच्या अभिप्राय व सूचना जाणून घेतल्या.

यावेळी सर्वश्री विजय उर्फ भाई गिरकर, आमदार विनायक मेटे, अमोल मिटकरी, सुरेश वरपूडकर तसेच महिला आमदार श्रीमती माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, मनीषा चौधरी, श्वेता महाले, डॉ. भारती लव्हेकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, निधी व न्याय विभागाचे सचिव भुपेंद्र गुरव, विधी व न्याय विभागाचे अवर सचिव सुभाष नलावडे, उपस्थित होते.

यावेळी पुढील महिला संघटनांनी आपले अभिप्राय व सूचना संयुक्त समितीपुढे मांडल्या. ॲड. निशा शिवूरकर, सदस्या, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, औरंगाबाद, डॉ. अपर्णा कोत्तापल्ले, सहयोगी प्राध्यापक, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, औरंगाबाद, प्रा. भारती भांडेकर विश्वास, अध्यक्षा, जागृती मंच, ॲड. ज्योती पतकी, औरंगाबाद, श्रीमती आसमा शेख, अध्यक्षा, प्रेरणा सामाजिक संस्था, ॲड. प्रिया गोंधळेकर, सय्यदा नुझहत बेगम, स. इमरान अली, औरंगाबाद, श्रीमती अश्विनी लखमले, अध्यक्षा, माऊली बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, दीपक लखमले, औरंगाबाद, लक्ष्मणराव देशमुख, अध्यक्ष कन्टोनमेंट जन अधिकार मंच, श्रीमती ममता मोरे, औरंगाबाद, श्री. चंद्रकांत सोनवने, अध्यक्ष साहित्य संस्कार प्रबोधिनी संस्था, तन्मय सोनवणे, ॲड. रेणुका घुले, औरंगाबाद, आप्पसाहेब उगले, अध्यक्ष, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, श्रीमती अन्नपूर्णा ढोरे, श्रीमती मोहिनी निकम, औरंगाबाद, श्रीमती छाया घाटे, अध्यक्षा, प्रियंका समुदाय संस्था, औरंगाबाद, श्रीमती जया पाईकराव, अध्यक्षा, रमाबाई आंबेडकर संस्था, श्रीमती कल्पना बनकर, औरंगाबाद, आप्पासाहेब गायकवाड, अध्यक्ष, महाराष्ट्र विकास केंद्र, श्रीमती संगिता गायकवाड, श्रीमती ज्योती शेजुळ, औरंगाबाद, डॉ. रश्मी बोरीकर, सजग महिला संघर्ष समिती, औरंगाबाद, श्रीमती सुरेखा पंडितराव महाजन, अध्यक्षा, उच्च न्यायालय, बार कौन्सिल, ॲड. अनुराधा मंत्री, श्रीमती अनघा कुलकर्णी, श्रीमती पुजा बनकर, औरंगाबाद, विलास केसरचंद पाटनी, अध्यक्ष, जिल्हा वकिल संघ. जिल्हा न्यायालय, ॲड. संदीप शिरसाट, औरंगाबाद, ॲड. सिंधू भोळे, औरंगाबाद, ॲड. रंजन कडेठाणकर, जिल्हा व सत्र न्यायालय, औरंगाबाद.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 'शक्ती फौजदारी कायदे विधेयक' बाबत संयुक्त समितीची बैठक संपन्न