गुड फ्रायडे व ईस्टर संडे निमित्त मार्गदर्शक सुचना जारी
प्रकाशन दिनांक : 27/03/2021
औरंगाबाद, दि.27, (जिमाका) :- शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव विचारात घेता “गुड फ्रायडे आणि ईस्टर सन्डे” हे सण यावर्षी दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशानाने कळविले आहे “गुड फ्रायडे आणि ईस्टर सन्डे” बाबत सर्व जनतेला काय करावे आणि काय करु नये याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
अ.क्र. |
काय करावे |
काय करु नये
|
01 |
6. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. 7. |
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्लंघन करण्यात येऊ नये. 8. |
02 |
9. दिनांक 28 मार्च ते 4 एप्रिल2021 या दरम्यान होली वीक मध्ये प्रत्येक प्रार्थना सभेच्या वेळी चर्चमधील जागेनुसार लोकांच्या उपस्थितीचे नियमन करावे. मोठे चर्च असल्यास जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती व चर्चमधील जागा कमी असल्यास 10-25 लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन प्रार्थना सभेचे आयोजन करावे. 10. |
चर्चमध्ये प्रार्थना सभेच्या वेळी जनतेने कोणत्याही प्रकारे गर्दी करु नये. |
03 |
ख्रिश्चन बांधवांनी प्रार्थना सभेच्या वेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. व्यवस्थापकांनी चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करावी. |
प्रार्थनास्थळी (Multiple Masses) च्या वेळी चर्चमध्ये गर्दी करु नये. |
04 |
11. चर्चचे व्यवस्थापक यांनी प्रार्थना सभेच्या ऑनलाईन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी. व या सणासाठी दिले जाणारे संदेश व्हॉट्स अॅप, फेसबुक, युटयूब यासारख्या सोशल मिडीया माध्यमांतून प्रसारीत करावे. |
कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये तसेच मिरवणूका काढण्यात येऊ नये.
|
05 |
12. स्थानिक प्रशासनाने चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन होईल याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
|
जनतेने स्वतःहून मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंग व अनुषंगिक नियमांचे उल्लंघन करु नये. |
******