बंद

गट नं. 233 व 234 मधील सनद रद्द : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

प्रकाशन दिनांक : 02/07/2021

औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे निर्गमित अकृषिक सनद मधील अट क्र.09 ची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 258 अन्वये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी चित्तेगाव ग.न.233 व 234 मध्ये औरंगाबाद येथील संजीवकुमार हरकचंद कांकरिया मे. रघुविर कॅपिटल सर्व्हीसेस, सुभाष मानकचंद झांबड व सुशील बलदावा यांचे नावे फेब्रुवारी रोजी रहिवास प्रयोजनासाठी दिलेली सनद रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी कळवले आहे.