खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या सेवा घाटी रुग्णालयात अधिग्रहित
प्रकाशन दिनांक : 16/09/2020
औरंगाबाद, दि.15 (जिमाका) :- औरंगाबाद शहरात कोरोना (कोव्हीड-19) या विषाणूमुळे जास्त प्रमाणात रुग्ण बाधीत होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील फ्रीलांन्सिग व खाजगी व्यवसाय करणा-या डॉक्टरांची सेवा शासकीय रुग्णालयमध्ये अधिग्रहित करणे आवश्यक झाले आहे. त्याअनुषंगाने सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 63 व 65 (1) (अ) मधील तरतुदीनुसार अध्यक्ष, इंडियन मेडीकल असोसीएशन, औरंगाबाद यांनी उपलब्ध करून दिलेल्या यादीतील प्रथमतः फ्रीलांन्सिग डॉक्टर्स व तदनंतर अनुक्रमांकानुसार औरंगाबाद शहरामधील खाजगी व्यवसाय करणा-या डॉक्टर्स यांच्या सेवा दरमहा 15 दिवसांची शिफ्ट व 7 दिवसांचे अलगीकरण याप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयऔरंगाबाद यांच्याकडे अधिग्रहित करीत आहे.
उपरोक्त खाजगी व्यवसायीक डॉक्टर्स यांनी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयव रुग्णालय, औरंगाबाद यांच्याकडे तात्काळ रुजू व्हावे. नसता संबंधिताविरुध्द साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच संबंधीत वैद्यकीय व्यवसायिकांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
सदर डॉक्टर्स यांना प्रतिमहा रुपये 1,25000/- मानधन निश्चित करण्यात आले असून त्यांच्या मानधनाचा खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियान व तत्सम योजनांच्या उपलब्ध निधीतून भागविण्यात यावा. सदर डॉक्टर्सच्या कामकाज व अन्य कार्यप्रमाणीच्या बाबींच्या अनुषंगाने अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयव रुग्णालय, औरंगाबाद यांनी अटी व शर्ती विहित कराव्यात, असे आदेशात नमूद आहे.
Physician
Sr.No. |
Doctor’s Name |
Mobile No |
1. |
डॉ. अजय वटगे Dr. Ajay Watge |
9503517963 |
2. |
डॉ. दिलीप ठोंबरे Dr. Dilip Thombre |
9146808123 |
3. |
डॉ. विवेश मुळे Dr. Vivek muley |
|
4. |
डॉ. प्रफुल्ल पांडे Dr. Prafull Pande |
9730667969 |
5. |
डॉ. अमित चोरडिया Dr. Amit Chordiya |
9923365050 |
6. |
डॉ. अभिमन्यु मकने Dr. Abhimanyu Makne |
9822314268 |
Anesthesiologists / Intensivists
Sr.No. |
Doctor’s Name |
1. |
डॉ. निखिल नारायण बाटणे Dr. Nikhil Narayan Bante |
2. |
डॉ. राहूल रामराव चौधरी Dr. Rahul Ramrao Choudhari |
3. |
डॉ. सय्यद उमर अब्दुल जब्बार कुरेशी Dr. Syed Umar Abdu Jabbar Quadri |
4. |
डॉ. भगीरथ अंकुशराव चोले Dr. Bhagirath Anskushrao Chole |
5. |
डॉ. नितिन जगन्नाथ अधाने Dr. Nitin Jagannath Adhane |
6. |
डॉ. गिरिश्मा विजयकुमार टंभाले Dr. Girishma Vijaykumar Tambhale |