बंद

खाजगी रुग्णालयातील सर्व रुग्णांनी अॅण्टीजन टेस्टसाठी सहकार्य करावे – उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे

प्रकाशन दिनांक : 01/08/2020

औरंगाबाद,दि.31(जिमाका) – वाळुज व रांजणगाव परिसरातील  कोरोना रुग्ण  वाढीला आळा घालण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत वैद्यकीय तपासणी, अॅण्टीजन टेस्‍ट  सुरू आहे.तरी वाळूज व रांजणगाव परिसरातील सर्व खाजगी रूग्‍णालयातील डॉक्‍टरांनी आपल्या  रूग्‍णालयात दाखल सर्व रूग्‍णांनी अॅण्टीजन टेस्‍ट केली असल्याची खबरदारी घ्यावी.सर्व आजाराच्या रुग्णांनी टेस्ट करून  कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आप्पासाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी व  नोडल अधिकारी तालुका गंगापुर यांनी आज येथे केले.

        जिल्‍हाधिकारी उदय चौधरी यांच्‍या निर्देशानुसार  ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव येथे उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे, यांनी  खाजगी डॉक्‍टरांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

         प्रशासनातर्फै  अॅण्टीजन टेस्ट करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर, ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव ,गरवारे गरवारे कम्युनिटी हॉल वाळुंज , येथे कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत.       

         तसेच सदर ठिकाणी आरटी पीसीआर टेस्टिंग करण्यात येत आहे .  तरी अॅंटीजन टेस्ट , आरटी पीसीआर टेस्टिंगसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात पुढे यावे.जेणेकरून संसर्ग वेळीच रोखण्यासाठी आणि बाधितांना तत्परतेने उपचार सुरू करणे शक्य होईल.तसेच मेडिकल असोसिएशन गंगापूर तालुका यांनी डॉक्टरांच्या शिफारशी शिवाय थेट रुग्णांना किंवा सामान्य जनतेला आपल्याकडून औषधे वितरित करू नयेत असे सूचित करण्यात आले.

       वाळूज , रांजणगाव व गंगापूर तालुक्‍यातील इतर गावातील सर्व नागरिकांनी जास्‍तीत जास्‍त अॅंटीजन टेस्‍ट करून घ्‍याव्‍यात, आपले व आपल्‍या कूटूंबाचे आरोग्‍य चांगले ठेवावे व प्रशासनास वेळोवेळी सहकार्य करावे,असे आवाहनही श्री.शिंदे यांनी केले.

          सदर बैठकीमध्ये कोविड रुग्णसंख्या कमी करणे,  खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णांची अॅंटीजन टेस्ट करणेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली . यासाठी सर्व खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.

          खाजगी डॉक्‍टरांकडे दिवसभरात येणाऱ्या रुग्णांना गरवारे कम्युनिटी हॉल वाळूज व ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव येथे आयोजित अॅंटीजन टेस्ट कॅम्‍पमध्ये ते दाखल करण्याबाबत सुचित करण्यात आले. दिवसभरात प्राप्त होणाऱ्या रुग्णांची यादी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले. खाजगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे  समुपदेशन करणे बाबतही चर्चा करण्यात आली तसेच सर्व खाजगी डॉक्टर त्यांच्याकडील सर्व कर्मचारी यांची कोरोना टेस्ट करून घेण्याबाबत सूचित केले.

        सदर बैठकीस तालूका आरोग्‍य अधिकारी मंगेश घोडके, पंचायत समिती सदस्‍य रांजणगाव , ग्रामपंचायत सदस्‍य , मंडळ अधिकारी , ग्रामसेव‍क , तलाठी उपस्थित होते . सदर बैठकी नंतर उपस्‍थीत सर्व डॉक्‍टर व उपस्थित कर्मचारी यांची अॅंटीजन टेस्‍ट करण्‍यात आली. त्‍याच प्रमाणे उपजिल्‍हा रूग्‍णालय यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गंगापूर शहरातील सर्व खाजगी डॉक्‍टरांचीही आढावा बैठक झाली.

image