बंद

खर्च लेख्यातील त्रूटीमुळे दहा उमेदवारांना नोटीसखुलासा ४८ तासांत करण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 18/04/2019

औरंगाबाद, दिनांक १७ (जिमाका)- औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक खर्चाच्या नियंत्रणासाठी दैनंदिन खर्चाचा लेखा तीन वेळा निवडणूक खर्च निरीक्षकांकडून तपासून घेणे आवश्यक आहे. यानुसार दुसऱ्या तपासणीत दहा उमेदवारांच्या दैनंदिन खर्च लेख्यात त्रूटी आढळल्याने या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नोटीस बजावली आहे.

खर्च लेखा तपासणीमध्ये  हर्षवर्धन जाधव, फुलारे सुरेश आसाराम, खान ऐजाज अहेमद, शेख ख्वाजा शेख कासिम किस्मतवाला, निर्मळ संगीता कल्याणराव, शेख नदीम शेख करीम, त्रिभूवन मधुकर पद्माकर, दीपाली लालजी मिसाळ, कांबळे अरविंद किसनराव, मोहमंद मोहसीन या उमेदवारांच्या दैनंदिन खर्च लेखा तपासणीत खर्च लेखाबाबत त्रूटी आढळल्या आहेत.

त्रूटींबाबत नोटीसद्वारे या उमेदवारांना दिनांक १६ एप्रिल रोजी कळविले आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे खुलासा सादर करावा. खुलासा सादर न करणा-या उमेदवाराविरोधात भा.दं.वि. १८६० चे कलम १७१ (१) नुसार कार्यवाही करण्यात येईल, याची संबंधित उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे श्री. चौधरी यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे.

*****