बंद

कोविड मृतांच्या नातेवाईक, वारसदारांना सहायता निधीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 17/12/2021

औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यातील कोविडमुळे मृत झालेल्या कुटुंबियाच्या नातेवाईक, वारसदार यांना रु.50 हजार सहायता निधी देण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु आहे, पात्र नातेवाईक, वारसदारांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

सहायता निधीसाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह mahacoivd19relief.in या संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी संकेतस्थळावर आवश्यक आहे. संकेतस्थळ, सेतू केंद्र, ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्रात नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना मयत झालेल्या रुग्णांचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. तसेच फक्त एकच वारसदार, नातेवाईक यांनी निधीसाठी अर्ज करावा. कोविड-19 स्वॅब टेस्ट रिपोर्ट (Antigen /RT-PCR),HRCT रिपोर्ट, हॉस्पिटलचे मृत्यू प्रमाणपत्र (MCCD) फॉर्म 4A मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, कोविड-19 मुळे घरी मृत्यू झाला असल्यास (MCCD) फॉर्म 4A ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिकाचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. वारसदार,नातेवाईकाचा Cancelled Cheque जोडणे ज्या वरील आयएफसी कोड व खाते क्रमांक तसेच निधी हा ऑनलाईन पद्धतीने खात्यावर जमा होणार असल्याने ठळक दिसेल असेच स्कॅन करुन अपलोड करावे. ज्या वारसदाराने मयताच्या सानुग्रह सहाय्य अर्ज केला आहे अशा घरी जाऊन गृहभेटीद्वारे खात्री करुन त्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन जिल्हा स्तरावरुन मदत केली जाणार आहे. तरी पात्र नातेवाईक, वारसदारांनी लवकरात लवकर सानुग्रह सहाय्य अनुदान प्राप्त होण्यासाठी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करावी. याबाबत मयत झालेले व्यक्तीच्या कुटुंबियासाठी कुठलीही तक्रार असल्यास जिल्हा तक्रार निवारण समिती कोविड-19 मध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. तिथे तक्रार दाखल करावी.अर्ज अपात्र ठरल्यास अपील करावे, असेही कुलकर्णी यांनी कळविले आहे.