बंद

कोरोना विरुद्ध लढाईत लोक कलापथकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनजागृती महत्वाची ठरणार आहे – अपरजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

प्रकाशन दिनांक : 15/02/2021

औरंगाबाद जिल्ह्यात आत्मनिर्भरभारतCOVID-19 लसीकरण जनजागृती पर चित्ररथ व लोक कलापथकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

          औरंगाबाद, दिनांक- 15 (जिमाका):कोरोना विरुद्ध लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि या लढाईत लोक कलापथकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनजागृती महत्वाची ठरणार आहे असे प्रतिपादन अपरजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा प्रदेश) च्या वतीने आत्मनिर्भरभारत, COVID-19 लसीकरण जनजागृती चित्ररथाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा प्रदेश) च्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्यात आत्मनिर्भरभारत, COVID-19 लसीकरण जनजागृतीपर 16 चित्ररथ आणि त्या चित्ररथावर नोंदणीकृत सांस्कृतिक लोक कलापथकांच्या सादरीकरणाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी एका चित्ररथाचे उद्घाटन आज दिनांक 15 फेब्रुवारी 2021 (सोमवार) रोजी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अपरजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी केले. औरंगाबाद जिल्ह्यात 15 ते 24 फेब्रुवारी 2021 पर्यंत 10 दिवस हे चित्ररथ फिरणार आहे. पुढे ते म्हणाले कोरोना विरुद्धच्या लढाईत केंद्र शासनाने COVID-19 लसीकरण व आत्मनिर्भरभारत वर लोक कलेच्या माध्यमातून जनजागृती हा एक अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे. सांस्कृतिक कलापथकं गीत व पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी प्रबोधन करतात.

आत्मनिर्भर भारत आणि COVID-19 लसीकरणाचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने या जनजागृती महाभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे पंजिकृत सांस्कृतिक लोक कलापथकांचे गट शासन व तळागाळातील शेवटच्या स्तरावरील लोकांकरीता महत्वाचा दुवा आहेत कारण ते मनोरंजन माध्यमातून योग्य माहिती प्रसारित करतात आणि जागरूकता निर्माण करतात.

यावेळी नोंदणीकृत सांस्कृतिक कलापथक, आभा कला मंच सोबतच क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद चे सहा. संचालक निखिल देशमुख, प्रबंधक संतोष देशमुख आदि उपस्थित होते. औरंगाबाद मध्ये ह्या जनजागृती चित्ररथावर लोक कलापथकांच्या सादरीकरणासाठी नोंदणीकृत आभा कला मंच व मीरा उमप अँड पार्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ह्या चित्ररथ जनजागृतीच्या यशस्‍वितेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबादचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, सहकारी राहुल मोहोड, प्रभात कुमार आदींनी परिश्रम घेतले.