कोरोना रूग्णांसाठीच्या खाटांबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
प्रकाशन दिनांक : 23/03/2021
औरंगाबाद,दि.22 (जिमाका) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांना निर्देशित केलेले आहे. शहरी भागात सीसीसी, डिसीएच आणि डीसीएचसी या उपचार सुविधांमध्ये एकुण 6014 खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तर ग्रामीण भागात सीसीसीमध्ये 1244, डीसीएचसीमध्ये 225 खाटा उपलब्ध आहेत. तसेच वाढत्या रूग्णसंख्येच्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधा, खाटांची उपलब्धता प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
तरी नागरिकांनी खाटांच्या उपलब्धते संदर्भात शहरी भागासाठी डॉ. बासीत अली खान, 9326789007 तसेच पीयुष राठोड, 8830061846, 8855876654 यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ग्रामीण भागातील खाटांसदर्भात डॉ. कुडीलकर यांच्याशी 9420703008 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.