बंद

कोरोना पार्श्वभूमीवर दक्षता घेत मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी – उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे

प्रकाशन दिनांक : 23/11/2020

औरंगाबाद, दि.20 (जिमाका) :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण दक्षता घेत व सूचनांचे पालन करीत औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याच्या  सूचना उपजिल्हाधिकारी तथा नोडल आरोग्य अधिकारी आप्पासाहेब शिंदे  यांनी केली.

            आज मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पदवीधर निवडणूक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. शिंदे बोलत होते यावेळी मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी मतदानापूर्वी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्या वेळी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत‍ घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली  असून त्यांनी मतदान केंद्रावरील हेल्पडेस्कच्या माध्यमातून मतदान केंद्र परिसरात येणाऱ्या प्रत्येक मतदाराना मास्क असणे, त्यांचे तापमान तपासणे याबाबत दक्षता घ्यावयाची आहे. 98.6 पेक्षा जास्त तापमान असलेल्या मतदारांना टोकन देवून 4 ते 5 या वेळेत त्यांना मतदान करता येईल. तसेच कोणताही आजारअसलेल्या रुग्णास मतदानाचा हक्क बजावयाचा असल्यास त्यांना 4 ते 5 या वेळेत मतदानकरता येईल. यासाठी आरोग्य अधिकारी मार्फत वाहनांची सुविधा उपलब्ध केली जाईल. याबाबत दक्षता घेण्याची सुचना श्री. शिंदे यांनी तसेच कोणताही मतदार  मतदानापासून  वंचित राहणार नाही . याबाबत  दक्ष राहण्याचे  सांगितले.

            मतदान केंद्रावर कोविड प्रतिबंधात्मक  साहित्य मास्क, सॅनिटाइजर, थर्मनगन हे  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत  पुरविण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य अधिकारी , कर्मचारी यांनी मतदारांची थर्मल गनव्दारे  तपासणी , सोशल डिस्टन्स राखण्यासाठी 6 फुटांवरील  मार्किग तसेच प्रवेश आणि निर्गय  याठिकाणी सॅनिटायझर वापराबाबतच्या सूचनाची अमंलबजावणी करित मतदान प्रक्रिया पार पाडावी, असे सांगितले.