बंद

कृषी औजारे संयंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 22/09/2020

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत कृषी  औजारे, संयंत्राच्या लाभासाठी 20-21 पासून शेतकऱ्यांनी  ऑनलाईन mahadbtmahait.gov.in   या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.

     संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याबाबत ‘ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना’ या सदरात सविस्तर माहिती आहे. मान्यताप्राप्त ट्रॅक्टर, पॉवर, टिलर व औजारांची यादी farmech.dac.gov.in  संकेतस्थळावर आहे. केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेकडील वैध तपासणी अहवाल उपलब्ध असलेल्या औजारांनाच अनुदान अनुज्ञेय आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ  कृषी  अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. मोटे यांनी केले आहे.