बंद

कलम 144 (1)(3) अन्वये जिल्हादंडाधिकाऱ्यांव्दारा जिल्ह्यात मनाई आदेश जारी

प्रकाशन दिनांक : 04/11/2020

औरंगाबाद, दिनांक 03 (जिमाका) : शासन आदेशानुसार मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 30 नोव्हेंबर 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) मधील तरतुदीनुसार जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) यापुर्वी लागू केलेले मनाई आदेश यापुढे दिनांक 30 नोव्हेंबर 2020 चे 24 वाजेपर्यंत लागू करीत आहेत. पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे आदेश अंमलात राहतील असे, जिल्हादंडाधिकारी यांच्याव्दारा निर्गमित आदेशात नमूद आहे.

शासन अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम खंड 2 (1) नुसार कोविड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी महानिगरपालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुख्य सचिव यांचे पत्रानुसार आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाजार, दुकाने, यांचे नियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगरपालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील.

आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा. दं. वि 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचे विरूद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही असे, जिल्हादंडाधिकारी यांच्याव्दारा निर्गमित आदेशात नमूद आहे.

कलम 144 (1)(3) अन्वये जिल्हादंडाधिकाऱ्यांव्दारा जिल्ह्यात मनाई आदेश जारी