औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी सहा नामनिर्देशनपत्र दाखल
प्रकाशन दिनांक : 10/11/2020
औरंगाबाद, दिनांक 10 (विमाका) :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता आज दि.10 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आजपर्यंत एकूण 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांचे नाव : जयसिंगराव गायकवाड पाटील (अपक्ष), औरंगाबाद, आशिष अशोक देशमुख (अपक्ष), मु.पो.खडकी घाट, ता.जि.बीड, प्रविुणकुमार विष्णू पोटभरे (अपक्ष), अंबाजोगाई, जि.बीड, भारत आसाराम फुलारे (अपक्ष), वडगाव (को), औरंगाबाद, ॲड.(डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), परभणी, बोराळकर शिरीष (पक्ष : भाजप) औरंगाबाद यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविली आहे.