बंद

औरंगाबाद लोकसभेसाठी 23 उमेदवार – जिल्हाधिकारी उदय चौधरी

प्रकाशन दिनांक : 08/04/2019

औरंगाबाद, दिनांक ०८ (जिमाका) – औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आज नामनिर्देशन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण सात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतली. यामध्ये प्रदीप दत्त, भगवान बापुराव साळवे, रवींद्र भास्करराव बोडखे, अब्दुल सत्तार अब्दुल नबी, कल्याण खंडेराव पाटील, जियाउल्लाह अकबर शेख, साजीद बेगू पटेल यांच्या नावांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आता औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २३ उमेदवार अंतिमत: पात्र आहेत. या उमेदवारांची निवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. मतगणना २३ मे रोजी होईल, असेही श्री. चौधरी म्हणाले.

यावेळी उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी, माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची उपस्थिती होती.    

निवडणुकीसाठी पात्र उमेदवार

अनु क्र.

उमेदवाराचे नाव

पक्ष

1.        

चंद्रकांत खैरे

शिवसेना

2.       

जया बाळू राजकुंडल

बहुजन समाज पार्टी

3.       

झांबड सुभाष माणकचंद

इंडियन नॅशनल काँग्रेस

4.      

अग्रवाल कुंजबिहारी जुगलकिशोर

प्रगतीशील समाजवादी पार्टी (लोहिया)

5.      

अरविंद किसनराव कांबळे

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी

6.       

इम्तियाज जलील सय्यद

ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लीमीन

7.      

उत्तम धनू राठोड

आसरा लोकमंच पार्टी

8.      

दीपाली लालजी मिसाळ

बहुजन मुक्ती पार्टी

9.       

नदीम राणा

बहुजन महापार्टी

10.    

एम.बी.मगरे

पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)

11.    

महमद जाकीर अब्दुल कादर

भारत प्रभात पार्टी

12.   

मोहसिन सर नसीम भाई

नवभारत निर्माण पार्टी

13.    

सुभाष किसनराव पाटील

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष

14.  

हबीब गयास शेख

आंबेडकर नॅशनल काँग्रेस

15.   

करंगुळ संजय बाबुराव

अपक्ष

16.   

खान एजाज अहेमद

अपक्ष

17.   

जगन बाबुराव साळवे

अपक्ष

18.   

फुलारे सुरेश आसाराम

अपक्ष

19.    

रवींद्र भानुदास काळे

अपक्ष

20.   

शेख खाजा शेख कासीम किस्मतवाला

अपक्ष

21.   

संगीता कल्याणराव निर्मळ

अपक्ष

22.  

हर्षवर्धनदादा रायभानजी जाधव

अपक्ष

23.   

त्रिभुवन मधुकर पद्माकर

अपक्ष

******

औरंगाबाद लोकसभेसाठी 23 उमेदवार