बंद

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात 18 नामनिर्देशन पत्र दाखल

प्रकाशन दिनांक : 05/04/2019

औरंगाबाद, दि.०२ (जि.मा.का.) – लोकसभा निवडणुकीसाठी दिनांक ०३ एप्रिल रोजी १९-औरंगाबाद लोकसभा मतदार  संघासाठी  पंधरा नामनिर्देशन दाखल झालेले आहेत. यामध्ये खैरे चंद्रकांत भाऊराव, रवींद्र भास्करराव बोडखे, मोहम्मद मोहसिन, मधुकर बन्सी मगरे, भगवान बापुराव साळवे, संजय बापूराव कुरंगळ, अन्वर मुसा शेख, जया बाळू राजकुंडल, कुंजबिहारी जुगलकिशोर अग्रवाल, इम्तियाज जलील सय्यद, अब्दुल सत्तार अब्दुल नबी, शारदा मुरलीधर चव्हाण, उत्तम धनु राठोड, देविदास रतनराव कसबे  यांचे एकूण १८  नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी कळविले आहे.                                                 

****