बंद

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातसहा नामनिर्देशन पत्र दाखल

प्रकाशन दिनांक : 05/04/2019

औरंगाबाद, दि.०२ (जि.मा.का.) – लोकसभा निवडणुकीसाठी दिनांक ०२ एप्रिल रोजी १९-औरंगाबाद लोकसभा मतदार  संघासाठी  सहा नामनिर्देशन दाखल झालेले आहेत. यामध्ये प्रदीपकुमार सचिंद्रकुमार दत्त, त्रिभूवन मधुकर पद्माकर, दीपाली लालजी मिसाळ, खान इजाज अहेमद, अरविंद किसनराव कांबळे, जियाउल्लाह अकबर शेख असे एकूण सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी कळविले आहे.                                                 

******