बंद

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 3 लाख 74 हजार 45 मतदार तर 813 मतदान केंद्र

प्रकाशन दिनांक : 25/11/2020

औरंगाबाद ,दि.25 (विमाका):- येत्या 01 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी विभागातील आठ जिल्ह्यात एकूण 3 लाख 74 हजार 45 मतदार असून मतदानासाठी एकूण 813 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्हानिहाय मतदार व मतदान केंद्रांची संख्या पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्रांची संख्या कंसात दर्शविली आहे. 1) औरंगाबाद-106379 (206) 2) जालना- 29765 (74) 3) परभणी – 32681 (78) 4) हिंगोली – 16764 (39) 5) नांदेड – 49285 (123) 6) बीड- 64349 (131) 7) लातूर – 41190 (88) 8) उस्मानाबाद – 33632 (74). अशी माहिती निवडणूक शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी दिली आहे.