बंद

औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळा कडून सुरक्षा रक्षकांना प्रवास भत्ता अदा

प्रकाशन दिनांक : 15/09/2020

औरंगाबाद, दि.14 (जिमाका) :- औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, शाखा कार्यालय, जालना, औरंगबाद या मंडळाने कोविड-19 च्या कालावधीत शासनाच्या व कामगार आयुक्त, मुंबई यांच्या आदेशान्वये मंडळातील माहे जुलै 2020 या महिन्यात कर्तव्यावर असलेल्या नोंदीत सुरक्षा रखकांना रक्कम रूपये 1000/- प्रवास भत्ता म्हणून देणे बाबत मंडळास आदेशीत केलेले होते. त्यानुसार शैलेंद्र ब. पोळ, कामगार तथा सचिव, औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, शाखा कार्यालय, जालना, औरंगाबाद यांच्या आदेशाने मंडळाच्या प्रशासकीय खात्यामधुन नोंदीत कार्यरत सुरक्षा रक्षकांना प्रत्येकी रक्कम रूपये 1000/- या प्रमाणे बँक खात्याव्दारे रक्कम वाटप केलेली आहे, असे राजकुमार तो. राठोड, कार्मिक अधिकारी, औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, औरंगाबाद यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.