बंद

औरंगाबाद ग्रामीण भागात 37 (1) (3) कलम लागू

प्रकाशन दिनांक : 12/03/2021

औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) :-  औरंगाबाद ग्रामीण भागात सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (37) (3) अन्वये प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

यामध्ये औरंगाबाद ग्रामीण भागात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा त्यांच्या जवळपास कोणतीही व्यक्ती,

सार्वजनिक ठिकाणी किंवा सडकेवर किंवा जवळपास शस्त्रे, सोटा, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणार नाही, जवळ बाळगणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा प्रवर्तक किंवा क्षेपनिक उपकरणे किंवा निकॉस्टि द्रव्ये गोळा करून ठेवणार नाहीत किंवा जवळ बाळगणार नाही किंवा तयार करणार नाही. कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समुहाच्या भावना जाणून बुजून देखाव्याच्या उद्देशाने वाद्ये वाजविणार नाही किंवा जाहीरपणे किंवा प्रक्षोभक किंवा जाहीरपणे असभ्य वर्तन करणार नाही. प्रतिमा अथवा प्रते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करणार नाही. जाहीरपणे घोषणा देणार नाही, गाणे किंवा त्यांचे ध्वनीमुळे सार्वजनिक शांतता भंग होणार नाही असे ध्वनीक्षेपणही करणार नाही. 

अशा प्राधिकाऱ्यांच्या मते ज्यामुळे सभ्यता, अगर नितिमत्तेस धक्का पोहचेल अशी जिल्ह्याची किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्यची वृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करू नये. सोंग अगर हावभाव करू नये आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करून नये, त्यांचे प्रदर्शने करून नये किंवा त्यांचा जनतेत प्रसार करू नये. तसेच औरंगाबाद ग्रामीण जिल्हा अंतर्गत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्या व निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय कर्मचारी विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरीत्या परवानगी दिलेल्या अशा मिरवणुकीला लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच पेक्षा जास्त जमण्यासाठी सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक, वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील (ग्रामीण) जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तसेच पोलीस अधीक्षक (ग्रामीण) औंरगाबाद यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहील, असेही आदेशात म्हटले आहे. हा आदेश 22मार्च पर्यंत अंमलात राहील, असेही म्हटले आहे.