बंद

औरंगाबादचा पाणी प्रश्न राज्यपालांच्या बैठकीत मांडणार – डॉ. भागवत कराड

प्रकाशन दिनांक : 12/02/2019

औरंगाबाद, दिनांक 11-  औरंगाबाद शहराला होणारा पाणी पुरवठा दररोज सुरळीतपणे व्हावा, यासाठी जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडीपर्यंतच्या पाणी पुरवठ्यासंदर्भातील प्रश्न राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 16 रोजी सकाळी 11.30 वाजता राजभवन येथे होणाऱ्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. सदरील योजना पूर्णत्वासाठी येणाऱ्या खर्चास येत्या अर्थसंकल्पात विशेष बाब म्हणून समाविष्ट करा, अशी विनंतीही राज्यपालांना करणार असल्याचे डॉ. कराड म्हणाले.

मराठवाडा विकास मंडळामार्फत विविध विकासकामांचा, अपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेऊन डॉ. कराड यांनी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. राजभवन येथे राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मराठवाड्याचा अनुशेष, मराठवाड्यातील अपूर्ण प्रकल्प, नवीन अर्थसंकल्पात आवश्यक तरतुदी, प्रशासकीय स्वरूपाच्या योजना यांचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले. 

 

औरंगाबादचा पाणी प्रश्न राज्यपालांच्या बैठकीत मांडणार- डॉ. भागवत कराड