बंद

ऑक्टोबर 2019 ते ऑगस्ट 2020 या कालावधीतील पाणीपुरवठयासाठीच्या नवीन उद्भावाची (स्त्रोताची ) माहिती उपलब्ध

प्रकाशन दिनांक : 23/10/2020

औरंगाबाद,दि.23 (जिमाका) जनतेच्या पिण्याच्या पाण्याची निकड लक्षात घेता त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना म्हणून राज्य शासनाने सार्वजनिक पिण्याचे पाण्याचा उद्भव (स्त्रोत ) संरक्षित करण्यसाठी एक विशेष अधिनियम पारीत केलेला आहे.

या अधिनियमास महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन ) अधिनियम 2009 असे नाव दिलेले आहे व सदरील अधिनियम संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू करण्यात आलेला आहे.  या अधिनियमातील नियम 20 नुसार तालुकानिहाय, गावनिहाय ऑक्टोबर 2019 ते ऑगस्ट  2020 या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या नवीन विंधन विहीर कार्यक्रमांतर्गत खोदण्यात आलेल्या विंधन विहिरीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करण्यासाठी केलेल्या नवीन उद्भवाची (स्त्रोताची )माहिती दिलेली आहे. सदरील यादी उप-विभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, गट विकास अधिकारी कार्यालय, नगरपालिका कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय येथे जनतेच्या माहितीसाठी नोटीस बोर्डवर चिटकविण्यात आलेली आहेत.

सर्व जनतेस नवीन उद्भवाबाबतच्या गावनिहाय  याद्या  27 आक्टोबर ते 10 नोव्हेबर 2020 पर्यंत बघावयास मिळतील याची नोंद घ्यावी. महाराष्ट्र भूजल (विकास व्यवस्थापन) अधिनियम  2009 चे (21)नुसार पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत संरक्षित करण्यासाठी सदर स्त्रोतापासून 500  मीटरच्या आत पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनाशिवाय अन्य कारणांसाठी स्त्रोत निर्माण करण्यास अथवा सदर  सार्वजनिक स्त्रोतामधून पिण्याच्या पाण्याशिवाय पाणी उपसण्यास प्रतिबंध राहील. या आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र भूजल अधिनियमातील तरतूदी अन्वये संबंधिताविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे