बंद

एमएचटी सीइटीचे अतिरिक्त सेशन 07 रोजी

प्रकाशन दिनांक : 05/11/2020

औरंगाबाद, दि.5 (जिमाका) – राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्या मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी विज्ञान प्रवेशासाठी घेण्यात येणारी (MHT-CET)2020 अतिरिक्त सेशन 7 नोव्हेंबर रोजी आयऑन डिजिटल झोन, एमआयडीसी पोलीस स्टेशन, चिकलठाणा जवळ होणार आहे. परीक्षेसाठी 131 उमेदवारांना प्रवेश देण्यात आलेला आहे. परीक्षेच्या वेळेचा तपशील 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत प्रथम सत्र व दुपारी 2.30 ते 5.30 पर्यंत व्दितीय सत्र असेल.

परीक्षेस येताना उमेदवारांनी ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे प्रवेश पत्र एक फोटो, कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकाराचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी तसेच नावात जर बदल झाला असेल तर राजपत्राची मूळ प्रत किंवा शपथपत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत आणावे. परीक्षा कक्षामध्ये सकाळी 7.30 वाजेनंतर व दुपारी 12.30 वाजेनंतर उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवार त्यांच्या सोबत डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्ल्यूटुथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आगामी परीक्षांकरीता बंदी घालण्यात येईल. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत. तसेच या परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी www.mahacet.org या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.