बंद

एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र पाहण्यासाठी प्रशासनाची परवानगी

प्रकाशन दिनांक : 20/01/2021

 

औरंगाबाद,दिनांक.20(जिमाका): औरंगाबाद येथील एपीजे अब्‍दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्‍लब तसेच 3-D थियटर आणि तारांगण विद्यार्थी व नागरिकांना पाहण्‍यासाठी या विज्ञान केंद्राच्या  मागणी प्रमाणे अटी व शर्तींच्‍या अधीन राहून परवानगी देण्‍यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्गमित केले आहेत.

सेंटरच्‍या व्‍यवस्‍थापनामधील सर्व अधिकारी, कर्मचारी,साधन व्‍यक्‍ती इत्‍यादींची कोव्‍हीड-19 च्‍या अनुषंगाने RT-PCR चाचणी करणे बंधनकारक असेल.  केंद्रीय गृह मंत्रालय, आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्रालय इ. यांनी निश्‍चित केलेल्‍या प्रोटोकॉल तसेच महाराष्‍ट्र शासन व जिल्‍हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. प्रवेशासाठी तिकीट देताना ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक राहील. वाहन पार्किंग स्‍थळे, उपहारगृहे इत्‍यादी ठिकाणी फक्‍त डिजिटल पेमेंटला परवानगी असेल. परिसरामध्‍ये सामाजिक अंतराच्‍या निकषाचे पालन करून गर्दीचे योग्‍य व्‍यवस्‍थापन करण्‍यात यावेत, केंद्रामध्‍ये प्रवेश करतांना व्‍यवस्‍थापनाने Shifts, तुकड्यामध्‍ये विद्यार्थी, नागरिकांना प्रवेश द्यावा, केंद्रामध्‍ये शक्‍यतो वैयक्तिक कमीत कमी 6 फूट शारिरिक अंतर ठेवावे, मास्‍क लावलेल्‍या व्‍यक्‍तींनाच प्रवेश करण्‍याची परवानगी द्यावी (No Mask-No Entry……..), विज्ञान केंद्रामध्‍ये व तारांगणामध्‍ये फोटोग्राफी करण्‍यास सक्‍त मनाई असेल, सदरील केंद्रामध्‍ये प्रवेश करण्‍यापूर्वी हात साबणाने धुणे (किमान- 40-60 सेकंदापर्यंत) बंधनकारक असेल. त्‍याचबरोबर सर्व ठिकाणी अल्‍कोहोल युक्‍त हॅण्‍ड सॅनिटायझर चा वापर (किमान 20 सेकंदापर्यत) करावा. प्रवेशव्‍दारावर हात स्‍वच्‍छतेसाठी सॅनिटायझर डिस्‍पेंसर तसेच थर्मल स्क्रिनिंगची सोय करणे बंधनकारक असेल. कोविड-19 ची लक्षणे नसलेल्‍या (Asymptomatic) विद्यार्थी,नागरिकांनाच प्रवेश असेल. सदर ठिकाणी कोव्‍हीड-19 विषाणू संसर्ग रोखण्‍यासाठीच्‍या प्रतिबंधात्‍मक  उपाययोजना पोस्‍टर्सच्‍या माध्‍यमातून दर्शनी भागात लावण्‍यात याव्‍यात, सर्व ध्‍वनी, लाईट व फिल्‍म प्रदर्शने पुढील आदेशापर्यत बंद राहतील. सदरील केंद्रात प्रवेश व बाहेर जाणा-या मार्गाची स्‍वतंत्र व्‍यवस्‍था करावी,  सेंटरच्‍या परीसरात व संबंधित ठिकाणी प्रभावी स्‍वच्‍छता व निर्जंतुकीकरण करावे, विशेषतः शौचालय, हात-पाय धुण्‍याचे ठिकाण इत्‍यादी ठिकाणी स्‍वच्‍छतेबाबत विशेष लक्ष दिले जावे. वापरलेले मास्‍क, हातमोजे, डिस्‍पोजेबल मास्‍कची यांची योग्‍य विल्‍हेवाट लावली जात आहे. याची दक्षता घेण्‍यात यावी. विज्ञान केंद्रामध्‍ये कोणतेही खाद्यपदार्थ नेण्‍यास मनाई असेल. उपहारगृहाना केवळ सिलबंद बॉटलच्‍या पाण्‍यास विक्री करण्‍यास परवानगी असेल. सदरील केंद्रात प्रवेशाच्‍या वेळेची मर्यादा निश्चित करून देण्‍यात यावी. शक्‍यतो सेंटरमध्‍ये हॅण्‍डग्‍लोजचा वापर करावा तसेच मास्‍क , फेसकव्‍हर लावणे बंधनकारक राहिल. विद्यार्थी, नागरिकांचे तापमान (Thermal Screening) व O2 Level याची Pulse Oxymeter वर नोंद घेऊन नोंदवहीमध्‍ये नोंद करावी. विद्यार्थी, नागरिक व सेंटरच्‍या व्‍यवस्‍थापनामधील सर्व अधिकारी, कर्मचारी, साधन व्‍यक्‍ती इत्‍यादींनी आरोग्‍य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक राहिल. तसेच सदरील अॅपमध्‍ये संबंधितांची नाव नोंदणी झाल्‍याबाबतची खात्री करावी. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्‍यासाठी Social Distancing पाळून विद्यार्थी, नागरिक यांच्‍यामध्‍ये  भौतिकदृष्‍टया कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्‍यावी. कोविड 19 साथरोग संबंधी, सर्दी, खोकला, ताप, श्‍वसनसंस्‍थेशी संबंधित लक्षणे असणा-यांना प्रवेश देवू नये.  कोविड-19 शी  संबंधित वेळोवेळी निर्गमित होणारे शासन परीपत्रक, आदेश, निर्णय व या कार्यालयाचे

आदेशाचे पालन करण्‍यास कसूर केल्‍याचे निदर्शनास आल्‍यास संबंधितास  जबाबदार धरुन तात्‍काळ कारवाई केली जाईल, अशा अटी व शर्तीवर परवानगी देण्यात येत आहे.

अटी व शर्तींचे पालन न करणारी संस्‍था अथवा समुह, उल्‍लंघन करणारी कोणतीही व्‍यक्‍ती यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व नियमानुसार कारवाई करण्‍यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्‍यावी,असेही आदेशात नमूद आहे.