बंद

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 11/06/2021

औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) : ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा औरंगाबाद दौरा पुढील प्रमाणे राहील.

गुरूवार दिनांक 10 जून 2021 रोजी रात्रौ 11.30 वा. सुभेदारी विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

शुक्रवार दिनांक 11 जून 2021 रोजी सकाळी 9.30 वा. सुभेदारी विश्रामगृह औरंगाबाद येथून भडकल गेट चौकाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. भडकल गेट येथे आगमन व चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.50 वा. भडकल गेट येथून वाळूज के-सेक्टरकडे प्रयाण. सकाळी 10 ते 10.30 वा. वाळूज के-सेक्टर येथून सहव्यवस्थापकीय संचालक महावितरण कार्यालय, औरंगाबादकडे प्रयाण. सकाळी 10.45 वा. सहव्यवस्थापकीय संचालक महावितरण कार्यालय येथे आगमन व निधोना 33/11 उपकेंद्राचे ऑनलाईन उद्घाटन व महावितरण, महापारेषण, महाऊर्जाशी संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक सकाळी 11.30 वा. मराठवाडा इंडस्ट्रीज असोसिएशन व मसिहा संघटनेच्या सोबत चर्चा. स्थळ: सहव्यवस्थापकीय संचालक महावितरण कार्यालय. दुपारी 12 वा. पत्रकारांशी अनौपचारीक वार्तालाप. स्थळ: सहव्यवस्थापकीय संचालक महावितरण कार्यालय. दुपारी 12.30 वा. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यकर्ते व अनुसूचित जाती विभाग काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत संवाद. स्थळ: जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालय, औरंगाबाद. दुपारी 1 वा. सुभेदारी विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. सुभेदारी विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 1.30 वा. लोकमत कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 1.40 वा. लोकमत कार्यालय येथे आगमन व भेट. दुपारी 2 वा. औरंगाबाद येथून अंबाजोगाई, जि. बीडकडे शासकीय वाहनाने प्रयाण.