बंद

उमेवारांनी खर्चाचा तपशीलनिरीक्षकांकडून तपासून घ्यावा- उदय चौधरी तपासणी आजपासून, दुसरी मंगळवार, तिसरी २० व २१ रोजी

प्रकाशन दिनांक : 11/04/2019

औरंगाबाद, दिनांक १० (जिमाका) – औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे नियंत्रणासाठी दैनंदिन खर्चाचा लेखा तीन वेळा निवडणूक खर्च निरीक्षकांकडून तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह,  नियंत्रण कक्षात होईल.

तीन वेळा होणाऱ्या खर्च तपासणीत प्रत्येक तपासणी दोन दिवसांत विभागलेली आहे. दोन्ही दिवशी तपासणीत दोन सत्र आहेत. सकाळचे सत्र १० ते दुपारी एक आणि दुपारचे सत्र २ ते पाच राहील. दिनांक ११, १६ आणि २० एप्रिल रोजी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय खर्च तपासणी सकाळच्या सत्रात हर्षवर्धन जाधव, फुलारे सुरेश आसाराम, खान ऐजाज अहेमद, शेख ख्वाजा शेख कासिम किस्मतवाला, खैरे चंद्रकांत भाऊराव आणि निर्मळ संगीता कल्याणराव यांनी तर दुपारच्या सत्रात याच दिवशी शेख नदीम शेख करीम, त्रिभूवन मधुकर पद्माकर, दीपाली लालजी मिसाळ, कांबळे अरविंद किसनराव, मोहमंद मोहसीन या उमेदवारांची होईल.

दिनांक १२, १७ आणि २१ एप्रिल रोजी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय तपासणी सकाळच्या सत्रात झांबड सुभाष माणकचंद, मगरे मधुकर बन्सी, कुरंगळ संजय बाबुराव, राजकुंडल जया बाळू, अग्रवाल कुंजबिहारी जुगलकिशोर आणि इम्तियाज जलील सय्यद यांनी तर दुपारच्या सत्रात राठोड उत्तम धनु, पाटील सुभाष किसनराव, शेख हबीब गयास, महमंद जाकीर अब्दुल कादर, काळे रवींद्र भानुदास आणि साळवे बाबुराव जगन यांच्या खर्चाची तपासणी होईल.

नामनिर्देशन दाखल केलेल्या दिनांकापासून, निकाल जाहीर होईपर्यंतच्या दोन्ही दिवस धरून निवडणुकीसंबंधी खर्चाचा सर्व हिशोब ठेवणे उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीला ठेवणे आवश्यक आहे. खर्चाचा तपशील सर्व प्रमाणके, पुरावे व बँक पासबुक यासह सादर करावा. दैनंदिन खर्चाचा हिशोब उमेदवारांना दिलेल्या दिनांकास निवडणूक खर्च निरीक्षकांमार्फत तपासणी करून घ्यावा. जे उमेदवार तपासणी करून घेणार नाहीत, तपासणी लेखे सादर करणार नाहीत त्यांविरोधात भा.द. वि. १८६० चे कलम १७१ (१) नुसार कारवाई करण्यात येईल, असेही श्री. चौधरी म्हणाले.

*****