उत्तम सोनकांबळे यांनी स्विकारला सहसंचालक पदाचा कार्यभार
प्रकाशन दिनांक : 26/08/2020
औरंगाबाद,दि.25(जिमाका)- औरंगाबाद विभागाचे सहसंचालक लेखा व कोषागारे हे पद रिक्त होते. सदरील पदावर श्री. यु. एन. सोनकांबळे हे दि. 24 ऑगस्ट 2020 रोजी रुजू झालेले आहे. श्री. यु. एन. सोनकांबळे हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी यापुर्वी स्थानिक निधी लेखा, नाशिक व सहसंचालक लेखा व कोषागारे, अमरावती या पदावर काम केलेले आहे.
श्री. यु. एन. सोनकांबळे यांनी सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद या पदाचा कार्यभार स्विकारल्याबद्दल म. वि. ले. सेवा वर्गातील अधिकारी तसेच इतर अधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.