बंद

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम

प्रकाशन दिनांक : 18/09/2020

औरंगाबाद दि. 18 जिमाका – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

          शुक्रवार, दिनांक 18 रोजी सायं 7 वा विमानाने चिकलठाणा, औरंगाबाद येथे आगमन व सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.

          शनिवार, दिनांक 19 रोजी सकाळी 9 वा सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने पैठणकडे प्रयाण.सकाळी 10.15 वा संतपीठ कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने पैठण येथे भेट, पाहणी, व आढावा. सकाळी 11 वा पैठण येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 12.15वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आढावा बैठक. स्थळ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. दुपारी 1.30 ते 2 पर्यंत पत्रकार परिषद. स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. दुपारी 2 ते 3 वा राखीव. स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. दुपारी सोईनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून मोटारीने नाशिककडे प्रयाण.