बंद

आयटीआय प्रवेशासाठी अंतिम तारीख 31 ऑगस्ट

प्रकाशन दिनांक : 22/08/2020

औरंगाबाद, दि.21 (जिमाका) :- आय टी आय ऑगस्ट 2020 सत्रासाठी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे व पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्याकरीता शेवटची तारीख 31 ऑगस्ट झाली आहे.या संधीचा प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याची लाभ घ्यावा, असे आवाहन औद्यागिक प्रशिक्षण संस्थेने केले आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलींची) भडकल गेट जवळ, औरंगाबाद येथे प्रवेश सत्र ऑगस्ट 2020 प्रवेशासाठी ड्रस्टमॅन मेकिनिकल 20, ड्रेसमेकींग 40, इलेक्टॉनिक्स मशिन्स 24, फृट अँड व्हेजीटेबल प्रोसेसिंग 24, आयटीइएसएम 24, सेक्रेटिअल प्रॉक्टिस (इंग्रजी)24 अशाप्रकारे प्रवेशासाठी एकूण 156 जागा आहेत. अंतिम गुणवत्ता यादी दि. 05 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिली प्रवेश फेरी 08 ते 14 सप्टेंबर 2020, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थांना विकल्प व प्राधान्य सादर करणे करिता 09 ते 14 सप्टेंबर 2020, दुसरी प्रवेश फेरी 18 ते 22 सप्टेंबर 2020, तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थांना विकल्प व प्राधान्य सादर करणे करिता 18 ते 22 सप्टेंबर 2020, तिसरी प्रवेश फेरी 26 ते 30 सप्टेंबर 2020, चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थांना विकल्प व प्राधान्य सादर करणे करिता 26 ते 30 सप्टेंबर 2020, चौथी प्रवेश फेरी 6 ते 9 ऑक्टोबर 2020, नव्यावे ऑनलाईन अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे करिता 10 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2020, जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी 11 ते 18 ऑक्टोबर 2020, खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्तरावरील प्रवेश 9 सप्टेंबर 2020 ते प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत असून विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.