बंद

आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रकाशन दिनांक : 20/06/2019

औरंगाबाद, दि 19 (जिमाका): राज्य शासनामार्फत कॉमन सर्विस सेंटर (सेतू सुविधा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व संग्राम केंद्र) यांचे कॉमन ब्रँडिगचा करण्यात आले असून त्यांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ असे नाव देण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शहरी भागातील ६० वार्डासाठी व ग्रामीण भागातील १३ ग्रामपंचायतीसाठी पात्र अर्जदारांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ज्या वार्ड व ग्रामपंचायतीमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ रिक्त ठेवण्यात आले होते त्याठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचे www.aurangabad.gov.in या संकेतस्थळावर अटी व शर्ती तसेच ज्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ नाही अशा एकूण १४६ रिक्त ग्रामपंचायतीची यादी प्रसिद्ध केलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वर रिक्त ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मिळण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक २४ जून ते २२ जुलै २०१९ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद येथे अर्ज करावेत, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती, औरंगाबाद यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.

****