बंद

आपत्ती निवारणात सर्व यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक – जिल्हाधिकरी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 20/05/2022

औरंगाबाद, दिनांक 19 (जिमाका) : भविष्यातील पाण्याची आवश्यकता पाहता पुढील 30 वर्षातील मुबलक पाण्यासाठी जल जीवन मिशनअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. यासंबंधीची सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित अभियंत्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा परिषदेचे अभियंता आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मानसी 55 लिटर पाणी प्रत्येकाला मिळावे. नळाद्वारे मिळणारे हे पाणी स्वच्छ असावे, यासाठी सर्व यंत्रणांनी जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन करावे, तसेच या कामांची गती वाढवावी. विहित मुदतीत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

जल जीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 797 कामांचे सविस्तर नियोजन आराखडे तयार असून 520 कामांच्या निविदा काढण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी जिल्हाधिकारी चव्हाण यांना दिली.

आपत्ती निवारणात सर्व यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक