आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
प्रकाशन दिनांक : 07/09/2020
औरंगाबाद, दि.07 (जिमाका) :- आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी खा. भागवत कराड, मनपा आयुक्त अस्तिक पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनीही यावेळी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
