बंद

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा, निवासी शाळा, वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 07/12/2020

औरंगाबाद, दिनांक 4 (जिमाका) – औरंगाबाद जिल्‍हयातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्‍य निवासी शाळा व नववी ते बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांकरीता आदिवासी विभागांतर्गत असलेले शासकीय वसतिगृहे सुरु करण्‍यास मान्‍यता देण्यात येत आहे,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी  कळवले आहे.

संबंधित सर्व शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांनी जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र, ग्रामीण रुगणालय, उपजिल्‍हा रुग्‍णालय व महानगरपालिका रुग्‍णालयात, मनपाने निश्चित केलेल्‍या केंद्रात जावून कोविड-19 साठीची RT-PCRचाचणी करुन घ्‍यावी. सदर RT-PCR चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्‍यावी, कोविड-19 प्रतिबंधात्‍मक व इतर सुरक्षा उपाययोजना बाबत संबंधितांनी शासनाच्या सूचनांचे कटाक्षाने पालन करावे, असेही त्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.