बंद

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तत्काळ मदत द्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 02/02/2021

  • v जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत 13 प्रकरणे पात्र

औरंगाबाद, दि.29 (जिमाका): जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देत त्यांना तत्काळ मदत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत हेाते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होऊ नयेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.  शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला तत्काळ मदत मिळावी यासाठी कार्यवाही जलद पद्धतीने करावी, असे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी निर्देशित केले. यावेळी बैठकीत दाखल झालेल्या एकूण 16 प्रकरणांवर सविस्तर चर्चा केली. त्यातील 13 प्रकरणे पात्र ठरली. 1 प्रकरण अपात्र तर 2 प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली.

प्रारंभी श्री. जाधवर यांनी बैठकीत दाखल प्रकरणांची माहिती सादर केली. तसेच जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्याने आत्महत्या करूच नये तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार मिळवा व ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टीने उभारी 2.0 हा उपक्रम प्रशासनामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येणार असून त्याबाबतचे सविस्तर सादीकरणही यावेळी करण्यात आले.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तत्काळ मदत द्या