असंघटीत कामगारांची सी.एस.सी. मार्फत ऑनलाईन नोंदणी करावी-जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण
प्रकाशन दिनांक : 22/10/2021
औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : केंद्र शासनाने असंघटीत कामागरांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटीत कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटीत कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जातील.
त्याअनुषंगाने विविध व्यवसाय जसे की, शेतमजूर, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, नाका कामगार, बिडी कामगार, मच्छीमार, सुतार कामगार, प्लंबर, दगड फोड कामगार, वाजंत्री , नर्तक, फळ विक्रेते, किराणा विक्रेते, फेरीवाले, दुधवाले, पान वाले, चांभार, रस्तावरील विक्रेत, धोबी, वाढपी, कुंभार, विणकर, डबेवाले, रिक्षा चालक, ड्रायव्हर्स, सफाई कामगार, सेरीक्लचर कामगार, भाजी आणि फळ विक्रेत. वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग कामगार, केशकर्तनालय, रिक्षावाले, फेरीवाले, शेतमजुर यांच्यासारख्या विविध 300 व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने व दि. 26 ऑगस्ट 2021 पासून असंघटीत कामगारांची नोंदणी करण्याकरीता ई- श्रम पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी निकष पुढील प्रामणे असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्याचे वय 16 ते 59 असेन आवश्यक आहे. ती व्यक्ती आयकर भरणार नसावी, कर्मचारी भविष्य निधी व कर्मचारी राज्य विमा योजनेचे सभासद नसावी. शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातीलच असावे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड, बँक पासबुक, सक्रिय मोबाईल नंबर (ओटपी करीता) आधार कार्डशी लिंक असेने आवश्यक आहे. सर्व नागरी सेवा केंद्रावर सदरची नोंदणी मोफत आहे.
नोंदणी करणाऱ्या कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा योजना लागु असून या वर्षाचा हप्ता रु 12/- केंद्र शासनाकडून भरण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्हयासाठी 12 लक्ष नोंदणीचे उद्दीष्ट दिले आहे. त्या नुसार आज अखेर सुमारे 28 हजार कामगारांची नोंदणी झालेली आहे.
तरी वरील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी आपली नोंदणी ई श्रम पोर्टलवर करुन घ्यावी असे आवाहन जिलहाधिकारी , सुनील चव्हाण यांनी केले आहे.